Press Release
विश्वरुप प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यात तीन गारमेंटचे दिमाखात उद्घाटन
नागोठणे :—
“महिलांना सशक्त करा, महिलांना आत्मनिर्भर करा” या भावनेला मूर्त रूप देत नागोठणे येथे राधिका गारमेंटच्या युनिटचे दिमाखात उद् घाटन महाराष्ट्र भाजप महिला मोर्चा अध्यक्षा आ. सौ.चित्राताई वाघ यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील महाड येथील शारदा गारमेंट आणि इंदापूर येथील महालक्ष्मी गारमेंट यांचेही उद् घाटन याच ठिकाणी करण्यात आले.
महिलांना त्यांच्या गावातच रोजगार निर्माण व्हावा यासाठी या तिन्ही गारमेंट युनिट्सची संकल्पना विश्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहिणी सतीश धारप यांनी मांडली होती. त्यानुसार प्रतिष्ठानने संपूर्ण पूर्वतयारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्याचे कार्य यानिमित्ताने केले आहे.
सदर गारमेंट युनिटच्या
उद् घाटन प्रसंगी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार श्री. धैर्यशीलदादा पाटील, रायगड लोकसभा प्रमुख तथा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. सतीश धारप,भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. वैकुंठ पाटील व सौ. शर्मिलाताई पाटील,श्री. सोपान जांभेकर, भाजप नेते श्री. आस्वाद पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. नीलिमाताई पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती सौ.चित्राताई पाटील, पेण माजी नगराध्यक्ष सौ. प्रीतमताई पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. मंजुषा कुद्रीमोती, माजी जिल्हाध्यक्ष सौ. हेमा मानकर, सौ. श्रेया कुंटे, सौ. प्रियंका पिंपळे, विश्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. रोहिणी सतीश धारप, उपाध्यक्ष श्री. राजीव देवस्थळी, सचिव श्री. वसंत शेडगे विश्वस्त श्री. मनीष धारप श्री.सचिन धारप श्री. सुयोग आंग्रे श्री . संतोष भगत,सीईओ अथर्व धारप, प्रकल्प संचालक सौ. मीनल बुटाला इत्यादी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
या गारमेंट युनिट्समुळे रायगडातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या कौशल्याचा विकास होऊन आर्थिक सबलीकरणाची दिशा अधिक मजबूत होणार आहे. “एक पाऊल रोजगाराकडे, एक पाऊल सन्मानाकडे” हाच या प्रकल्पाचा खरा गाभा आहे.
विश्वरूप फाउंडेशनने महिलांना रोजगार मिळवून दिला
नागोठण्यात राधिका गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग युनिटचे शानदार उदघाटन लोकनायक न्यूज – https://loknayaknews.blogspot.com/2025/06/blog-post_27.html