रायगडात महिला रोजगार क्रांती – राधिका, शारदा आणि महालक्ष्मी गारमेंट युनिट्सचे भव्य उद्घाटन!
नागोठणे, 25 जून – महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत, राधिका गारमेंट युनिटचे उद्घाटन 200 पेक्षा अधिक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याच वेळी शारदा गारमेंट (महाड) व महालक्ष्मी गारमेंट (इंदापूर) यांचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने भाजप नेत्या मा. चित्राताई वाघ यांच्या हस्ते पार पडले.
विश्वरूप प्रतिष्ठानने आत्मनिर्भर भारतासाठी रायगडात मोलाचे पाऊल उचलले आहे,” असे गौरवोद्गार चित्राताईंनी यावेळी व्यक्त केले.


चित्राताईंनी यावेळी तीनही युनिट्सचे कौतुक करत “विश्वरूप प्रतिष्ठान आत्मनिर्भर भारतासाठी रायगडमध्ये मोलाचे पाऊल टाकत आहे” असे गौरवोद्गार काढले. राधिका गारमेंट युनिटमध्ये महिलांना वेळेनुसार कामाची संधी उपलब्ध होणार असून, युनिटला लंडनमधून 250 कुकिंग अॅप्रन ऑर्डर व 15000+ पिशव्यांची ऑर्डर मिळाली असल्याचे ऐकून उपस्थितांमध्ये आनंद आणि उत्साह संचारला.


संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिणी सतीश धारप* यांनी युनिट्सचे अभिनंदन करत, अनेक महिलांना रोजगार मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच “रायगडमध्ये असेच अनेक रोजगार प्रकल्प राबवणार आहोत” असा विश्वासही व्यक्त केला.
स्त्रियांच्या प्रगतीकडे नेणारा एक भक्कम पाऊल – विश्वरूप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून!

